धुक्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 10:51 AM2021-12-03T10:51:30+5:302021-12-03T10:51:59+5:30
घारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला.

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , मालवाहू ट्रक (क्रमांक पी.बी.१० ई.एच.९१७९) चालक हरजितसिंग व गुरुप्रीत हे दोघे पंजाब येथून कडबाकुट्टी यंत्राचे साहित्य घेऊन नाशिक येथून संगमनेर मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होते. गुरुवारी रात्री अकरा वाजलेच्या दरम्यान मालवाहू ट्रक नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे आला असता महामार्गावरील पडलेल्या धुक्याने चालकाला येथील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला. ट्रक महामार्गावर उलटला. अपघातग्रस्त ट्रक व ट्रकमधील माल हे रस्त्यावरच असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.