मोर्चा आला अंगलट
By Admin | Published: August 13, 2015 11:00 PM2015-08-13T23:00:06+5:302015-08-13T23:10:59+5:30
श्रीरामपूर : शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या एका शाळेतील शिक्षिकांनी नगरपालिकेत मोर्चा नेला.
श्रीरामपूर : शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या एका शाळेतील शिक्षिकांनी नगरपालिकेत मोर्चा नेला. पण कायद्याच्या कचाट्यात अडकलेला हा मोर्चा या शिक्षिकांच्या चांगलाच अंगलट आला.
या शाळेतील एका पुरूष शिक्षकाची बदली झाली आहे. त्यामुळे या शाळेत सध्या चार शिक्षिकाच आहेत. शाळेच्या परिसरातील गोंड, शिकलकरी समाजातील मुलांच्या दररोज घरी जाऊन दादा, बाबा करीत हात जोडून त्यांना शाळेत आणावे लागते. पूर्वीचे पुरूष शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आणीत होते. पण आता या शाळेत एकही पुरुष शिक्षक नसल्याने या महिलांची गेल्या काही महिन्यांपासून अडचण होत आहे. त्यातच या शाळेत सातवीपर्यंतचे विद्यार्थी असल्याने मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षिकांना अडचणी येतात़ याच मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून बदलून गेलेल्या आमच्या शिक्षकांना पुन्हा शाळेत नेमावे, असा आग्रह धरला़ त्यामुळे हा मोर्चा काढल्याचे शिक्षिकांनी सांगितले़
शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम सोडून विद्यार्थ्यांचा मोर्चा आणला, अध्यापन व शाळा बंद ठेवली या कारणावरून मोर्चा आणणाऱ्या शिक्षिकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा आदेश शिक्षण मंडळाचे प्रमुख व पालिका मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.