संगमनेर प्रातांधिकारी कार्यालयासमोर आदिवासी व शेतक-यांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:08 PM2018-10-20T18:08:17+5:302018-10-20T18:08:30+5:30
किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
संगमनेर : किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यासंदर्भात प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना पंधरा दिवसांपुर्वी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आदिवासी व शेतकरी बांधवांनी प्रांतकार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन केले. मोर्चाचे नेतृत्व अजित नवले करत आहेत.
अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात. वनजमिनी कसणारांच्या नावे करा. बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा. अशा विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे,उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर आदि अधिका-यांसमवेत आंदोलकांची चकमक झाली. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरुच असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरु आहे.