गुन्हा मागे घेण्याकरिता राहात्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:57 PM2018-04-21T17:57:07+5:302018-04-21T17:59:13+5:30
राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले.
राहाता : राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले.
राहाता नगर परिषदेव्दारे शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात होता. या कारणाने राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, सचिन गाडेकर यांच्यासह बाळासाहेब गिधाड यांनी राहाता नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक भाग्योदय परदेशी यांनी गढूळ पाण्याचा हार घालून गांधीगीरी केली होती. यातून परदेशी यांनी उपनराध्यक्ष, नगरसेवकांसह इतरांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने निषेध मोर्चा काढून नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करीत आदोलन केले. आठ दिवसात गुन्हे मागे घेतले नाही तर तीव्र आदोलन करण्यात येईल या प्रकारचा इशारा देण्यात आला. यावेळी रावसाहेब खेवरे, नाना बावके, संजय सोमवशी, संजय शिंदे, भरत आनाप, राजेंद्र अद्रवाल, कैलास सदाफळ, रामदास सदाफळ, अनिता जगताप, शारदा गिधाड, विनायक निकाळे यांच्या सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.