कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा महागाई विरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:14 PM2018-08-31T15:14:20+5:302018-08-31T15:14:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.
कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.
युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यापासून शहरातून बैलगाडी, दुचाकी ढकलत, सायकल, सरकारच्या तिरडी व निषेधाच्या फलकासह कोपरगाव तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. सर्व सामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहरासह तालुक्यातून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाढती महागाई व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार भाषणे केली. याप्रसंगी महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संखेने उपस्थिती होत्या .