संगमनेर प्रांत कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा : प्रवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:35 PM2018-09-14T12:35:10+5:302018-09-14T12:35:19+5:30

संगमनेरमध्ये पदवी व पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

Frontiers of tribal students on the Sangamner provincial office: deprived of admission | संगमनेर प्रांत कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा : प्रवेशापासून वंचित

संगमनेर प्रांत कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा : प्रवेशापासून वंचित

संगमनेर : संगमनेरमध्ये पदवी व पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.
संगमनेरातील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, अकोले, राजूरसह संगमनेर परिसरातील १८० आदिवासी विद्यार्थी पदवी व पदवीकेचे शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना संगमनेरातील शासकीय आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहात प्रवेश मिळाला नसल्याने त्यांनी मोर्चा काढला आहे.

Web Title: Frontiers of tribal students on the Sangamner provincial office: deprived of admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.