विमा कंपनीने फळपिक विमा डावलला; आश्वासनानंतर तिस-या दिवशी उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:11 PM2020-06-26T16:11:01+5:302020-06-26T16:12:13+5:30
विमा कंपनीने फळबाग पिकविमा डावलल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकरी अनिल बनकर यांनी उपोषण सुरू केले होते. बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेनंतर बनकर यांनी शुक्रवारी (२६ जून) तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले.
देवदैठण : विमा कंपनीने फळबाग पिकविमा डावलल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकरी अनिल बनकर यांनी उपोषण सुरू केले होते. बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेनंतर बनकर यांनी शुक्रवारी (२६ जून) तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले.
आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन बनकर यांनी उपोषण मागे घेतले.
बजाज अलायन्स विमा कंपनीचे प्रमोद पाटील ,अनुपम श्रेया, स्कायमेट कंपनीचे अरुण तिपुगडे, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी शुक्रवारी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्ते अनिल बनकर व शेतकºयांशी चर्चा केली. यात सकारात्मक चर्चा करुन तोडगा काढण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. यानंतर उपोषण मागे घेतले.