माथाडी कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा

By अरुण वाघमोडे | Published: April 7, 2023 02:39 PM2023-04-07T14:39:18+5:302023-04-07T14:48:26+5:30

काळे यांच्या नेतृत्वाखाली माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त व माथाडी बोर्डाचे अध्यक्ष नितीन कवले यांची त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी भेट घेऊन मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली.

Fulfill the promises made to the top workers, otherwise...; Congress warning | माथाडी कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा

माथाडी कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा

अहमदनगर : सहाय्यक कामगार आयुक्तांच्या  लेखी आश्वासनानंतर १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे माल धक्क्यावरील दरवाढ प्रश्नावरून सुरू असणारे कामगारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. यावेळी एक महिन्याच्या आत दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जर हे आश्वासन विहित मुदतीत पूर्ण केले गेले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. तसेच कामगारांना त्यांच्या हक्काचा आणि घामाचा मेहनताना असणार सुमारे  ३ ते ४ कोटींचा दरवाढीसह फरक मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

काळे यांच्या नेतृत्वाखाली माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त व माथाडी बोर्डाचे अध्यक्ष नितीन कवले यांची त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी भेट घेऊन मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी कामगारांच्या वतीने आश्वासनाच्या अंमलबजावणी बाबतचे स्मरण पत्र देण्यात आले. यावेळी कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, बाबासाहेब वैरागर, अमर डाके आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले की, यापूर्वी देखील मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वारंवार आश्वासन देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्ती नंतर कामगारांनी संयम दाखवत पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांची फसवणूक झाली नाही पाहिजे. नुकत्याच नगर दौऱ्यावर येऊन गेलेल्या माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या समवेत देखील कामगारांची या विषयासंदर्भात बैठक झाली असून आ. थोरात यांच्यासह काँग्रेस पक्ष कामगारांच्या या लढाईत त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

Web Title: Fulfill the promises made to the top workers, otherwise...; Congress warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.