पूर्णाकृती पुतळा बसवावा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:36+5:302021-02-10T04:20:36+5:30

श्रीरामपूर पालिका : रिपाइंचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन श्रीरामपूर : रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या आठ दिवसांत ...

A full-sized statue should be installed; Otherwise movement | पूर्णाकृती पुतळा बसवावा; अन्यथा आंदोलन

पूर्णाकृती पुतळा बसवावा; अन्यथा आंदोलन

श्रीरामपूर पालिका : रिपाइंचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

श्रीरामपूर : रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या आठ दिवसांत बसवावा; अन्यथा २२ फेब्रुवारी रोजी फुले, शाहू व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाने नगरपालिकेला दिला आहे. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राकेश कापसे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष अंतोन शेळके, उपाध्यक्ष रॉकी लोंढे, बसपाचे मच्छिंद्र ढोकणे, श्रीकांत म्हंकाळे, गौतम राऊत, गौतम दिवेकर, बसपाचे सुनील मगर आदी उपस्थित होते.

रेल्वे स्थानकाजवळ डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी २०१५ मध्ये निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांतच पुतळा तयार झाला; मात्र अद्यापही तो बसविण्यात आलेला नाही. या प्रश्नी अनेक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. नगरपालिकेला निवेदने दिली; मात्र केवळ तोंडी आश्वासने देण्यात आली. या दिरंगाईविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी संतोष मोकळ, इम्रान शेख, अलोक थोरात, अविनाश भोसले, विकास जगधने, नारायण देवडीगा, अभिजित आमले, रामभाऊ शिरसाठ, तुषार शेळके, भारत विघावे, रमेश विघावे, अजय साळवे आदी उपस्थित होते.

--------

Web Title: A full-sized statue should be installed; Otherwise movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.