वाहनचालकाने फुलविली बाग
By Admin | Published: June 26, 2016 12:28 AM2016-06-26T00:28:11+5:302016-06-26T00:35:08+5:30
अहमदनगर : सरकारी कार्यालयातील कर्मचारी फावल्या वेळेत गप्पा मारतात किंवा चहाच्या टपरीवर वेळ घालवितात. मात्र, नगर तहसील कार्यालयातील
अहमदनगर : सरकारी कार्यालयातील कर्मचारी फावल्या वेळेत गप्पा मारतात किंवा चहाच्या टपरीवर वेळ घालवितात. मात्र, नगर तहसील कार्यालयातील वाहनचालक उत्तम शंकर पवार यांनी फावल्या वेळेत तहसील कार्यालयाच्या रिकाम्या जागेत बाग फुलविली आहे. या बागेत तब्बल शंभराच्यावर झाडे लावली आहेत. यासाठी त्यांनी प्रशासकीय इमारतीमध्येच वर्गणी गोळा करून झाडांचे संगोपन केले आहे.
नगरचे तहसीलदार सुधीर पाटील यांच्या वाहनावर चालक म्हणून उत्तम पवार काम करीत आहेत. तहसीलदार पाटील कार्यालयात आल्यानंतर चालकांना तसे फारसे काम नसते. या फावल्या वेळेत त्यांनी बाग फुलविण्याचा उपक्रम हाती घेतला. सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत. या इमारतीच्या परिसरात पार्किंगसाठीची जागा सोडून इमारतीच्या अवतीभोवती मोकळी जागा आहे. या जागेतील कचरा पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हटविला. त्यानंतर या परिसरात विविध आयुर्वेदिक, फुलांची, फळांची झाडे लावली. याच बागेच्या मध्यभागी आवळा, वड, पिंपळ, बेल, उंबर अशी पाच झाडे एकाच ठिकाणी लावून त्याची पंचवटी तयार केली. या बागेत पुत्रवंती, लक्ष्मीतरू, निलगिरी, पळस, कांचन, जाईजुई, लालगुलाब, कवठ, चाफा, जास्वंदी, समुद्रवेल, लालपेरू, सुभाबुळ, आंबा, शेवगा, मोगरा, काशिद, लिंब, फणस, रातराणी, बहावा, जांभुळ, बकुळ, निळा गुलमोहोर, गुंजवेल, पपई, दोडका, बोगनवेल, लाजाळू, गवती चहा, कन्हेर, गुलाब, बदाम, गोकर्ण वेल, अडुळसा, मनीप्लाँट, पानपुटी, गुळवेल, पारिजात अशी झाडे लावली आहेत. पंचवटी ओटा आणि लिंब ओटा तयार केली आहे.