फंड भगिनी करणार महाराष्ट्र महिला कुस्ती टीमचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:12+5:302021-03-04T04:37:12+5:30
श्रीगोंदा : कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे १९ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या सब जुनिअर मुली व जुनिअर ...
श्रीगोंदा : कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे १९ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या सब जुनिअर मुली व जुनिअर मुली नॅशनल कुस्ती स्पर्धेचे श्रीगोंद्याची आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड व धनश्री फंड भगिनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत.
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात ३० मुलींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्रीगोंदा येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पाच मुलींचा समावेश आहे.
यामध्ये भाग्यश्री फंड (५९ किलो), धनश्री फंड (५७ किलो), पल्लवी पोटफोडे (६१ किलो), श्रेया मांडवे (४० किलो), श्रृती येवले (४३ किलो) यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या वजन गटात या मुली भिडणार आहेत. या मुलींना प्रशिक्षक किरण मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
....
महाराष्ट्र संघ निवड
सब जुनिअर गट-मुली
वजन गट : ४० किलो
टीम अ : श्रेया मांडावे
टीम ब : गौरी पाटील
वजन गट : ४३ किलो
टीम अ : श्रुती येवले
टीम ब : समृद्धी घोरपडे
वजन गट : ४६ किलो
टीम अ : नेहा चौगुले
टीम ब : रिया ढेणगे
वजन गट : ४९ किलो
टीम अ : कल्याणी गडेकर
टीम ब : तन्वी मगदूम
वजन गट : ५३ किलो
टीम अ : प्रगती गायकवाड
टीम ब : धनश्री फंड
वजन गट : ५७ किलो
टीम अ : श्रृती बामणवत
टीम ब : सिद्धी कणसे
वजन गट : ६१ किलो
टीम अ : पल्लवी पोटफोडे
टीम ब : सुप्रिया तुपे
वजन गट : ६५ किलो
टीम अ : प्रांजल सावंत
टीम ब : सिद्धी खोपडे
वजन गट : ६९ किलो
टीम अ : ऋतुजा जाधव
टीम ब : अमृता पुजारी
वजन अ : सई शिंदे
टीम ब : पल्लवी जाधव
....
जुनिअर गट मुली
वजन गट : ५० किलो
स्मिता पाटील
वजन गट : ५३ किलो
दिशा कारंडे
वजन गट : ५५ किलो
विश्रांती पाटील
वजन गट : ५७ किलो
भाग्यश्री फंड
वजन गट : ५९ किलो
अंकिता शिंदे
वजन गट : ६२ किलो
श्रृष्टी भोसले
वजन गट : ६२ किलो
गौरी जाधव
वजन गट : ६८ किलो
ऋतुजा संकपाळ
वजन गट : ७२ किलो
प्रतीक्षा बागडी
वजन गट : ७६ किलो
संजना बागडी.