राम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:32+5:302021-01-08T05:03:32+5:30

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, शहर संघ चालक शांतीभाई चंदे, जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, ...

Fund Dedication Campaign for Ram Temple | राम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान

राम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, शहर संघ चालक शांतीभाई चंदे, जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, रामदास महाराज क्षीरसागर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष जय भोसले, नाशिक विभाग कार्यकारिणी सदस्य सचिन राऊत, निधी संकलन संयोजक अनिल रामदासी, मोठा निधी प्रमुख राजेश झंवर, निधी संकलन संयोजक गजेंद्र सोनवणे, आदी उपस्थित होते. प्रारंभी वेदक यांनी श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, प्रत्येक घरातून किमान १० रुपये संकलित व्हावेत, असे नियोजन आहे. दहा रुपये ते इच्छित रक्कम प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संकलित करण्यात येणार आहे. रामजन्मभूमी न्यासाच्या थेट बँक खात्यावरही निधी पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. निधी संकलनासाठी सर्व राजकीय पक्षांनाही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अहमदनगरचे नाव काय असावे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वेदक म्हणाले, परकीयांची नावे स्वतंत्र भारतात पुसली गेली पाहिजेत. संभाजीनगरला आमचे समर्थन आहे. अहमदनगर शहराचे नगर हे नाव प्रचलित आहे. अहमदनगर ऐवजी नगर हे नाव करावे, अशी आमची भूमिका आहे.

Web Title: Fund Dedication Campaign for Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.