योग भवनच्या निर्मितीसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:26+5:302021-05-13T04:21:26+5:30
शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रमुख शहरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भवनच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ...
शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रमुख शहरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भवनच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास साडेसहा कोटींचा विशेष निधी संबंधित नगर परिषदांना उपलब्ध करून दिला आहे.
शिर्डी, नेवासा, देवळाली प्रवरा, राहाता, संगमनेर, अकोले नगरपालिकांना प्रत्येकी ८० तर कोपरगाव व श्रीरामपूर नगर परिषदांना ७५ लाख रूपये उपलब्ध होणार आहेत. खासदार सदाशिव लोखंडे यांनी या संदर्भातील पत्रे संबंधित नगर परिषदांना दिली. दहा योग भवन निर्मितीचे उद्दिष्ट असून, आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे लोखंडे यांनी शिर्डीत सांगितले.
यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, राहाता मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, शिर्डीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड, कमलाकर कोते, अभय शेळके, धनंजय गाडेकर, संजय शिंदे, सचिन कोते, मंगेश त्रिभुवन, विजय जगताप, गणेश सोमवंशी, आदी उपस्थित होते.