निधीची तरतूद करण्यात येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:09+5:302021-03-31T04:21:09+5:30
सुप्यातील प्रभाग ५ सर्वात मोठा प्रभाग असून नव्याने वसलेल्या या भागात झपाट्याने वसाहत वाढली असून कच्चे रस्ते असल्याने विद्यार्थी, ...
सुप्यातील प्रभाग ५ सर्वात मोठा प्रभाग असून नव्याने वसलेल्या या भागात झपाट्याने वसाहत वाढली असून कच्चे रस्ते असल्याने विद्यार्थी, वृद्ध, महिला, नागरिक या सर्वांना त्याचा त्रास होतो. सामाजिक कार्यकर्ते प्रताप शिंदे, पप्पू वाळुंज, प्रितेश टकले, सुनील बढे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
पारनेर रोड ते आदर्श नगर, पारनेर रोड ते ओंकार हॉस्पिटल व पारनेर रोड ते जांभुळवाडी शाळा या रोडच्या कामासाठी निधीची तरतूद करून रोडची कामे करण्याचा आग्रह धरला. कोरोना काळात निधीच नव्हता. आता तरतूद होत असल्याने ही कामे प्राधान्याने केली जातील असे दाते यांनी सांगितले. काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रताप शिंदे यांनी सांगितले.