‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:45 IST2025-03-18T12:44:29+5:302025-03-18T12:45:53+5:30
आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मृतावर सोमवारी अंत्यसंस्कार होताना गावात तणाव असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती
अहिल्यानगर : दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील माऊली सतीश गव्हाणे (१९) याचा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी सागर दादाभाऊ गव्हाणे (२०, रा. दाणेवाडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली.
आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मृतावर सोमवारी अंत्यसंस्कार होताना गावात तणाव असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
६ मार्चपासून बेपत्ता माऊलीचा मृतदेह १२ मार्चला सापडला. आरोपींनी खूनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून, पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. माऊली बेपत्ता झाल्याची तक्रार शिरूर पोलिस ठाण्यात दाखल होती. १२ मार्चला एका विहिरीत शीर व एक हात आणि पाय नसलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. हत्येचा कारणाचा तपास सुरू आहे.