राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ धावणाऱ्या सौरभ जाधवचे भविष्य उज्ज्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:29+5:302021-03-31T04:21:29+5:30
धावपटू सौरभ जाधव याच्या यशाबद्दल त्याचा क्रीडा कार्यालयातर्फे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेखर पाटील म्हणाले, चमत्काराशिवाय ...
धावपटू सौरभ जाधव याच्या यशाबद्दल त्याचा क्रीडा कार्यालयातर्फे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेखर पाटील म्हणाले, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही. त्यासाठी खेळाडूंनी चमत्कारपूर्ण कामगिरी केली पाहिजे. सरावातील सातत्य, योग्य आहार, पुरेशी झोप महत्त्वाची आहे. यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचा सातत्याने ध्यास घेतला तर यश हुलकावणी देत नाही. सौरभने राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ धावून राष्ट्राप्रती आपली भक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात तो अनेक स्पर्धांत आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. नगरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवेल यात शंका नाही. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, असे सांगितले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, स्काऊट गाईड निदेशक दिलीप भोर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक पोपट धामणे, शिक्षक दत्तात्रय धामणे, साहेबराव जाधव, विजय जाधव, रमेश पोवार आदी उपस्थित होते.
-------
फोटो - ३० जाधव सत्कार
उदयोन्मुख धावपटू सौरभ जाधव याच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल गर्जे, दिलीप भोर, पोपट धामणे, दत्तात्रय धामणे, साहेबराव जाधव, विजय जाधव, रमेश पोवार आदी उपस्थित होते.