गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

By अण्णा नवथर | Published: February 22, 2024 01:42 PM2024-02-22T13:42:38+5:302024-02-22T13:57:08+5:30

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकर याने आरोप केले आहेत. पण...

Gaddar Barskar was stuttered two months ago; Dagant told what happened | गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

अहमदनगर - मराठ्यांशी गद्दारी करणारा अजय बारसकर हा मनोज जरांगे पाटील यांच्या टिममध्ये नव्हता. त्याला मराठा मोर्चातून दोन महिन्यांपूर्वी हकलेले आहे. त्यान मराठा समाजाशी गद्दारी केलेली आहे. त्याला समाज कधीही माफ करणार नाही, असल्याची माहिती अहमदनगर सकल मराठा समाजाचे ॲड. गजेंद्र दांगट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकरने आरोप केले आहेत. या आरोपाला अहमदनगर मराठा सकल समाजाने उत्तर दिले. गजेंद्र दांगट पुढे म्हणाले, अजय बारसकर कधीही मोर्चात सहभागी नव्हता. तो जिथे आंदोलन सुरू असते. तिथे जातो आणि भाषण करतो. मराठा मोर्चातील माहिती घेऊन तो सरकारला पुरवित होता. मराठा आंदोलनामुळे मराठा नेते संपले तर आपले काय होईल, याची त्याला चिंता आहे. त्याला जर मराठा समाजाची चिंता असती तर त्याने स्वतंत्र आंदोलन केले असते. मात्र त्याने स्वतंत्र आंदोलन करता मराठा आंदोलनात फुट पाडण्याची सरकारकडून सुपारी घेतली आहे.  मागील चार दिवसांत एका नेत्यांच्यासोबत हेलिकॅप्टरमध्ये फिरत होता, अशी माहिती आहे.त्याचवेळी हे षडयंत्र रचले गेले असून, त्यानुसारच बारसकर जरांगे पाटील यांच्यावर आरोप करतो आहे. त्याने मुंबई पत्रकार परिषद घेतली. त्याच्या बातम्याही प्रसिध्द होत असून, यामागे मोठी शक्ती आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

तुकाराम महाराजांनी बारसकरला हेच शिकवले का

तुकाराम महाराज यांच्या नावाने बारसकर हा दुकानदारी करतो. तो सांगतो कि मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे. तुकाराम महाराज यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे. तुकाराम महाराज यांनी बारसकरला हे शिकविले का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. 

Web Title: Gaddar Barskar was stuttered two months ago; Dagant told what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.