पाचेगावची गहिनीनाथ महाराज यात्रा यंदाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:41+5:302021-05-17T04:18:41+5:30
पाचेगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ३१ मेपर्यंत पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील गहिनीनाथ महाराज देवस्थानची २१ मे ...
पाचेगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ३१ मेपर्यंत पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील गहिनीनाथ महाराज देवस्थानची २१ मे रोजी होणारी यात्रा रद्द केल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासन आणि गहिनीनाथ महाराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे. सालाबादप्रमाणे गहिनीनाथ महाराजांची यात्रा अक्षय्य तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी दरवर्षी भरत असते. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्ह्यात लागू असलेली जमावबंदी, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भाविक भक्तांनी गर्दी करू नये. गंगाजल आणण्यासाठी कावडीधारकांनी जाऊ नये. लागू असलेल्या संचारबंदी, जमावबंदीचे कुणीही उल्लंघन करू नये. २० मे ते २२ मे या काळात मंदिर परिसर पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. कोणीही मंदिर परिसरात फिरकू नये. कायद्याचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन यात्रा उत्सव समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.