औरंगाबादमधील भाजपा पदाधिका-यावर हल्ला करणारे आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:43 PM2018-06-05T18:43:32+5:302018-06-05T18:47:25+5:30
औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली.
अहमदनगर: औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली.
बाळू कैलास गायकवाड (वय २५ रा. कैकाडीवाडा, बेगमपूरा औरंगाबाद), गिरीश बााबसाहेब जाधव (वय २४ रा. बजरंग चौक, पढेगाव, औरंगाबाद), शैलेश संदिप पटारे (रा. डिंबर गलली औरंगाबाद) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत़
औरंगाबाद येथील भाजपाचे सरचिटणीस संजय फकिरचंद फत्तेलष्कर यांच्यावर जुन्या वादातून ६ मे रोजी औरंगाबाद येथील बेगमपूरा परिसरात तिघांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून हल्ला केला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गायकवाड, जाधव व पटारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून हे तिघे फरार होते. हे तिघे घोडेगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. सोमवारी एलसीबीमधील सहाय्यक निरिक्षक डॉ. शरद गोर्डे, उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, कॉस्टेबल सोन्याबापू नानेकर, योगेश गोसावी, उमेश खेडकर, निगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले,विजय ठोंबरे, योगेश सातपुते, बबन बेरड आदींच्या पथकाने घोडेगाव येथून तिघांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी बेगमपूरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.