व्यापाºयाची बॅग पळविणारा आरोपी ४० मिनिटात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:03 PM2020-02-18T14:03:08+5:302020-02-18T14:03:16+5:30
नेवासा : सोमवारी रात्री नेवासा बस स्थानक परिसरातून नाशिकच्या व्यापा?्याची आठ लाख बावन्न हजार रुपये असलेली बँग हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला नेवासा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अवघ्या चाळीस मिनिटांत जेरबंद केले असून व्यापारी संजीव नवल (रा.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येवून सागर राजू माने यास अटक केली
नेवासा : सोमवारी रात्री नेवासा बस स्थानक परिसरातून नाशिकच्या व्यापा?्याची आठ लाख बावन्न हजार रुपये असलेली बँग हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला नेवासा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अवघ्या चाळीस मिनिटांत जेरबंद केले असून व्यापारी संजीव नवल (रा.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येवून सागर राजू माने यास अटक केली तर त्याच्या इतर साथीदारांच्या शोध घेण्यासाठी नेवासा पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे संजीव नवल यांच्या मालकीचे प्लॉट विक्री करण्यासाठी नवल हे शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. तेथे गणेश उगले,अमर कळाल,रमेश घोरतळे, किरण घोरतळे,बाळासाहेब ईगल,यांना प्लॉट विक्री करून ८ लाख ५२ हजाराची रक्कम घेऊन साडेसहाच्या सुमारास नाशिकला जाण्यासाठी शेवगाव बसस्थानकावर आले. बस नसल्याने बाहेर रस्त्यावर येऊन काळी-पिवळी गाडीने साडेआठच्या सुमारास नेवासा येथे आल्यानंतर श्रीरामपूरकडे जाण्यासाठी अर्धा तास रस्त्यावर थांबले. तेथे एक गाडी आली. त्यात प्रवाशी बसत होते. ती गाडी श्रीरामपूरला जाणार असल्याने नवल हे बसत असतांना अचानक बॅग मागे ओढत असल्याचे जाणवले. त्यांनी ही बॅग पुढे ओढण्यासाठी प्रयत्न केले. या झटापटीत बॅगचा बंद तुटला.त्यावेळी नवल यांची बॅग घेऊन एक जण पळाला. त्यावेळी नवल यांनी आरडाओरडा करत त्याचा पाठलाग केला. मात्र काही अंतरावर त्याचा साथीदार विना नंबर प्लेटच्या गाडीवर उभा होता. त्यावेळी तो त्याच्या साथीदाराच्या गाडीवर बसला. त्यावेळी दोघे श्रीरामपूरच्या दिशेने पळाले. त्यावेळी आरडाओरडा झाल्याने बस स्थानक परिसरातील लोकांनी चोरांचा पाठलाग केला. तसेच या घटनेची स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
दरम्यान नवल हे फिर्याद देत असतांना पोलीस निरीक्षक रणजित डेरे,सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे,हेडकोन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार,पोलिस नाईक महेश कचे,
पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे,पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे,पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे,पोलीस कॉन्स्टेबल योगेश आव्हाड,पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ,पोलीस कॉन्स्टेबल अमोल बुचकूल,पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भवार,पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कुंढारे यांनी स्थानिक नागरिक संदीप पेचे,काका काळे,दादा काळे,तुषार जायगुडे यांच्या मदतीने सागर राजू माने (रा.हिंजवडी,पुणे) यास नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरीलसाईनाथ नगर परिसरात पाठलाग करून पकडले.