जेऊरमध्ये विजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:51+5:302021-02-16T04:21:51+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपसरपंच श्रीतेश ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपसरपंच श्रीतेश पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
जेऊर परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून शेतकरी वैतागले आहेत. सिंगल फेज १० तास बंद राहते. थ्री फेज वीज पूर्णदाबाने मिळत नसल्याने विद्युतपंप चालत नाहीत. शेतकऱ्यांना पिकांना पाणी रात्रीच द्यावे लागते. यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरी व बोअरवेलला फेब्रुवारी महिन्यातही पाणी उपलब्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असल्याने शेतामध्ये गावरान कांदा, लसूण, गहू, हरभरा, मका, ज्वारीची पेरणी केलेली आहे. परंतु विहिरीत पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. तरी जेऊर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी उपसरपंच श्रीतेश पवार यांच्यासह नारायण तोडमल, गणपत वने, हेमंत शेटे, शरद तोडमल, बाळू शेटे, संभाजी तोडमल, सूरज पवार, नंदू तोडमल, चंद्रकांत पवार यांनी केली आहे.