भाजपा मुलाखती दरम्यान गांधी-आगरकर समर्थक भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 10:02 PM2019-09-04T22:02:19+5:302019-09-04T22:03:10+5:30

शिस्तप्रिय म्हणविणा-या भाजपाच्या नगर येथील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली़

Gandhi-Agarkar supporters flocked during BJP interviews | भाजपा मुलाखती दरम्यान गांधी-आगरकर समर्थक भिडले

भाजपा मुलाखती दरम्यान गांधी-आगरकर समर्थक भिडले


अहमदनगर: शिस्तप्रिय म्हणविणा-या भाजपाच्या नगर येथील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ माजी खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक उपमहापौर मालन ढवण यांचे पुत्र संजय, तर  अ‍ॅड़ अभय आगरकर यांचे समर्थक मानले जाणारे संपत नलावडे यांच्यात सायंकाळी जोरदार हाणामारी झाली़ दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने वातावरण निवळले़
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगर शहरासह जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती झाल्या़ भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास अंबटकर यांच्या उपस्थित येथील तारकपूर येथील अलिशान हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर मुलाखती घेण्यात आल्या़ जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून मुलाखती शांतेतत पार पडल्या़ सायंकाळी शहर मतदारसंघातील मुलाखतींना सुरुवात झाली़ मुलीखती दरम्यान भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीच संजीव ढोणे व अ‍ॅड़ अभय आगरकर यांचे समर्थक संपत नलावडे यांची हॉटेलच्या परिसरात भेट झाली़ महापौर बाबासाहेब वाकळे हेही ढोणे यांच्यासोबत होते़ हॉटेलच्या प्रवेशव्दारावर  कोण कुणासाठी आले, यावरून दोघांमध्ये वादावादी झाली़ त्याचे रुपांतर हाणामारीत झाले़ दोघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावली़ त्यानंतर हे दोघे मुलाखती सुरू असलेल्या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर गेले़ तिथे पदाधिकाºयांसमोर पुन्हा वादावादी झाली़ वाद वाढल्याने मुलाखती थांबवून अंबटकर यांच्यासह पदाधिकारी मुलाखत कक्षातून बाहेर पडले़  प्रदेशाध्यक्ष अंबटकर मात्र दरम्यान तारकपूर येथील हॉटेलमध्ये वादावादी झाल्याची खबर मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले़ मात्र तोपर्यंत वाद निवळला होता़ 

Web Title: Gandhi-Agarkar supporters flocked during BJP interviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.