कोपरगावात काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात गांधीगिरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:57+5:302021-02-18T04:35:57+5:30
कोपरगाव : तालुक्यासह शहर कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी ( दि.१७ ) शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल ...
कोपरगाव : तालुक्यासह शहर कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी ( दि.१७ ) शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर शंभरी गाठत असल्याने गुलाबपुष्प तसेच लाडू भरवून पंपावर स्वागत करीत अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्राहकांनी भाववाढीवर नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्य जगायचे तरी कसे? अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे म्हणाले, गेल्या काळात वीज दरवाढ झाली म्हणून वीजबिलांची होळी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता पेट्रोल, डिझेल भाववाढीवर पेट्रोलपंपाची व गॅस सिलेंडरची होळी केल्यास अधिक समाधान वाटेल. तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी मोदी सरकारने आश्वसीत केल्याप्रमाणे ग्राहकांना १५ लाख खात्यात आले का? विचारणा केली. तसेच दरवाढीसाठी आपणच कारणीभूत आहोत, त्यामुळे तोंड गोड करा व पुन्हा झालेली चूक करू नका असे सांगितले. शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी ग्राहकांना गुलाबपुष्प देत दरवाढ अजून झाल्यास आश्चर्य वाटायला नको पक्षीय मार्केटिंगवर न जाता केलेल्या कामावर मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कोपरगाव तालुका उपाध्यक्ष विजय जाधव, शहर सचिव लक्ष्मण फुलकर, लक्ष्मण फुलकर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष आब्बास सय्यद, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष राजू पठाण, अनुसूचित जाती विभाग जिल्हा सचिव यादव त्रिभुवन, अनुसूचित जाती काँग्रेस विभाग तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, अनुसूचित जाती विभाग शहराध्यक्ष रवींद्र साबळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय आग्रें, युवक तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव निरंजन कुडेकर, विद्यार्थी शहराध्यक्ष अशपाक सय्यद, विद्यार्थी कार्याध्यक्ष ऋषिकेश पगारे, सोशल मीडियाचे कोपरगाव विधानसभा अध्यक्ष दादा आवारे, समीर पठाण तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक उपास्थित होते.