नगरच्या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते उद्घाटन करुन गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:41 PM2017-10-14T13:41:25+5:302017-10-14T14:04:18+5:30
अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे. त्यामुळे सरकारच्या ...
अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ जागरुक नागरिक मंचातर्फे शनिवारी या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते प्रतिकात्मक उद्घाटन करुन गांधीगिरी करण्यात आली.
नगर शहरातील सक्कर चौक येथून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे हा उड्डाणपूल रेंगाळला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला या उड्डाणपुलाच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन झालेच नाही. त्यामुळे जागरुक नागरिक मंचातर्फे या उड्डाणपुलाच्या कामाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. शक्कर चौक येथे हा प्रतिकात्मक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला.