समृद्धी महामार्गाच्या वाहनांचे डिझेल चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:17+5:302021-02-20T04:57:17+5:30

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड ...

A gang of diesel thieves of vehicles of Samrudhi Highway has gone missing | समृद्धी महामार्गाच्या वाहनांचे डिझेल चोरणारी टोळी गजाआड

समृद्धी महामार्गाच्या वाहनांचे डिझेल चोरणारी टोळी गजाआड

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पीकअप टेम्पोसह दोन लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्तीवरील समृद्धी महामार्गाच्या कॅम्पवरून ११४० लिटर डिझेल, लुकस कंपनीचे सेल्फ स्टार्टर, ॲमेरॉन कंपनीचे काळे रंगाची बॅटरी व लुमीनस कंपनीचे लाल रंगाची बॅटरी तसेच चार बॅटऱ्याचे केबल असा एकूण १ लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.१६) पहाटे चार ते पावणेपाच वाजेदरम्यान घडली होती. याप्रकरणी विक्रांत राजेंद्र सोनवणे (रा.गजानननगर, कोपरगाव ) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणाची पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस हवालदार रामकृष्ण खारतोडे, किशोर कुळधर, प्रकाश कुंढारे, गणेश मैड, संभाजी शिंदे, ए. एम. दारकुंडे यांची दोन वेगवेगळे पथक तयार केली. या पथकाने अमोल मच्छिंद्र आहेर ( रा. वाकडी ता. राहता ), चेतन अरविंद गिरमे ( रा. धारणगाव, ता. कोपरगाव ), राजीवसिंह राम आसरेसिंह ( रा. मर्गुपूर पो. तेजीबझार जि. जौनपूर, उत्तर प्रदेश ), अंगदकुमार रामपाल बिंद ( रा. रामनगर, ता. सहागंज जि.जौनपूर, उत्तर प्रदेश ) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख ३६ हजार १५० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो ( एम.एच. १७ अे.जी. ७६०१ ) प्लॅस्टिकच्या चार मोठ्या बॅरलमध्ये १ हजार ३० लिटर डिझेल व इतरही वस्तू हस्तगत केल्या आहेत. अटकेतील चारही आरोपींना कोपरगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: A gang of diesel thieves of vehicles of Samrudhi Highway has gone missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.