दरोडेखोरांची टोळी गजाआड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 05:24 PM2019-03-23T17:24:09+5:302019-03-23T17:24:13+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(दि़२२) रात्री नगर-मनमाड रोडवरील देहरेटोलनाका परिसरात कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली़

Gang of gangsters seized: 1 lakh 65 thousand worth of money seized | दरोडेखोरांची टोळी गजाआड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

दरोडेखोरांची टोळी गजाआड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(दि़२२) रात्री नगर-मनमाड रोडवरील देहरेटोलनाका परिसरात कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली़ या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले़ अंधाराचा फायदा घेऊन दोघे फरार झाले़
अल्तमश नासीर पठाण (वय २१), सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय २३) अविनाश श्रीधर साळवे (वय २०), सागर गोरख मांजरे (वय २०), भाऊसाहेब मधुकर गोरे (वय २६) व शहारुख निसार पिंजारी (वय २२ रा़ सर्व श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ सिराज उर्फ सोज्लर शेख यांची गँग नगर-मनमाड रोडने कोठेतरी दरोडा टाकण्यास जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हेड कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, योगेश गोसावी, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, विशाल दळवी, राहुल सोळुंके, रवीकिरण सोनटक्के, दीपक श्ािंदे, विजय ठोंबरे, मच्छिंद्र बर्डे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने आरोपींना सापळा लावून अटक केली़ या आरोपींकडून एक लोखंडी सुरा, कटावणी, एक सत्तूर, लाकडी दांडके, नायलॉन दोरी, मोबाईल, चार मोटारसायकली जप्त केल्या़ आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

आरोपी सराईत गुन्हेगार
पोलीसांनी पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर श्रीरामपूर सह तोफखाना, भिंगार, राहुरी या पोलीस ठाण्यात जोरी, जबरी चोरी, मारहाण दरोडे खून, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ सिराज शेख याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आलेली आहे़

 

Web Title: Gang of gangsters seized: 1 lakh 65 thousand worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.