भीमा नदीकाठी वाळू तस्करीतून टोळीयुध्द; एकास बेदम मारहाण, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:55 AM2020-09-25T11:55:11+5:302020-09-25T11:56:23+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे  रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना  सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली.

Gang warfare over sand smuggling along Bhima river; One beaten to death, four arrested | भीमा नदीकाठी वाळू तस्करीतून टोळीयुध्द; एकास बेदम मारहाण, चौघांना अटक

भीमा नदीकाठी वाळू तस्करीतून टोळीयुध्द; एकास बेदम मारहाण, चौघांना अटक

श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथे  रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना  सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली.

  याबाबत  नितीन वसंत सकट यांनी फिर्याद दिली आहे. नदीतून वाळू भरुन जाणा-या ट्रकमुळे पेडगाव गावातील रस्ते खराब होत आहेत. आम्ही त्यांना पेडगाव येथून वाळूच्या गाड्या नेवू नका असे सांगितले. याच कारणावरुन पप्पू उर्फ महेश हनुमंत कोथींबरे (रा.श्रींगोदा),  मुक्तार मैनुद्दीन काझी,  आसीफ समशोद्दीन तांडेल (सर्व रा. पेडगाव, ता.श्रीगोदा), जालिंदर घोडेकर  (रा.बेलवंडी कोठार, ता.श्रीगोंदा) यांनी मला शिवीगाळ दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मुख्य माफीया महेश कोंथबीरे याला दौड येथे तर तिघांना पेडगाव मध्ये अटक केली आहे.

Web Title: Gang warfare over sand smuggling along Bhima river; One beaten to death, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.