पोहेगावात गुंडाची दहशत; एकास जबर मारहाण; पोलीस निरीक्षकांचे कारवाईचे आश्वासन

By सचिन धर्मापुरीकर | Published: June 7, 2024 06:06 PM2024-06-07T18:06:34+5:302024-06-07T18:08:27+5:30

आरोपींच्या अटकेसाठी एकवटले गाव

Gangster terror in Pohegaon; Beating one; Police Inspector's assurance of action | पोहेगावात गुंडाची दहशत; एकास जबर मारहाण; पोलीस निरीक्षकांचे कारवाईचे आश्वासन

पोहेगावात गुंडाची दहशत; एकास जबर मारहाण; पोलीस निरीक्षकांचे कारवाईचे आश्वासन

सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव: तालुक्यातील पोहेगावमध्ये गुरूवारी दुपारी मोटारसायकल वरून आलेल्या गुंडांनी सागर दिनकर भालेराव या युवकास जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भालेराव जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे.

गुरूवारी दुपारी सागर भालेराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बसलेले असताना आरोपी शरद गोटीराम फुलारे, नवनाथ उर्फ भावड्या गोर्डे व इतर दहा ते पंधरा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सागर भालेराववर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांना तात्काळ शिर्डी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आंबेडकर नगर परिसरातील महिला व पुरुष पोहेगाव ग्रामपंचायतीत दाखल झाले. दोनशे तीनशेचा लावा जमा घेऊन ते शिर्डी पोलिस स्टेशन गाठणार होते.

या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहीती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक कुंभार यांनी पोहेगावात दाखल झाले. दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी आरोपींनी हॉकीस्टीक, लाकडी दांडे अदी वस्तूंचा वापर करत परिसरात दहशत पसरवली असून आम्हाला संरक्षण द्या, सागर भालेराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तडीपरीची मागणी केली.

नितीनराव औताडे यांनी नागरिकांना शांत करत पोलीस निरीक्षक कुंभार हे निश्चित न्याय देतील व आरोपीवर कारवाई करतील असे सांगत, शिर्डी पोलिस स्टेशनने सुरक्षीतता म्हणून पोहेगावमध्ये तात्काळ आऊट पोस्ट सुरू करावे अशी मागणी देखील त्यांनी केली. पोलिस निरीक्षक कुंभार यांनी आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिले. सरपंच अमोल औताडे यांनी त्यांचे आभार मानले.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पावले उचलली जातील. आंबेडकरनगर व पोहेगाव परिसरात दर दोन तासाला शिर्डी पोलिसांची पेट्रोलिंगसाठी गाडी पाठवण्यात येईल. फिर्यादीचा जबाब घेऊन आरोपीवर योग्य कलमे लावले जातील.
-रामकृष्ण कुंभार, पोलिस निरीक्षक, शिर्डी.

Web Title: Gangster terror in Pohegaon; Beating one; Police Inspector's assurance of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.