कचरा डेपोत हरवले सुपा बसस्थानक
By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:15+5:302020-12-05T04:34:15+5:30
सुपा : सर्वत्र पडलेला कचरा, बाजूलाही आजूबाजूचा कचरा, इमारतीवर उगवलेले गवत, अशी अवस्था सुपा (ता. पारनेर) बसस्थानकाची झाली आहे. ...
सुपा : सर्वत्र पडलेला कचरा, बाजूलाही आजूबाजूचा कचरा, इमारतीवर उगवलेले गवत, अशी अवस्था सुपा (ता. पारनेर) बसस्थानकाची झाली आहे. येथे प्रवाशांऐवजी कचऱ्याचेच साम्राज्य दिसून येत आहे.
पुणे- नगर रस्त्यावरून शेकडो बस धावतात. त्यातील बहुतांश बस सुप्यात थांबतात. येथे बसथांबा असूनही बसस्थानकात न येता चालक-वाहक रस्त्यावरच बस थांबवून प्रवाशांची चढ-उतार होते. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील बसस्थानकावर पारनेर आगाराच्या बस वगळता अन्य बस येत नाहीत. वाहतूक नियंत्रकाच्या इमारतीवर वाढलेल्या झाडाकडे आजूबाजूला पडलेल्या कचऱ्याकडे, अस्वच्छ स्वच्छतालयाकडे कधी लक्ष जाते व त्याची स्वच्छता केव्हा होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
फोटो ०२ सुपा बसस्टँड
सुपा बसस्थानक परिसरात पडलेला कचरा.