जीवधन किल्ल्यावरील दरवाजाचा रस्ता झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:27+5:302021-03-25T04:20:27+5:30
पारनेर : जीवधन किल्ल्यावरील कल्याण दरवाजाजवळील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पारनेर तालुक्यातील ‘आडवाटेचं पारनेर’ व सह्याद्री ...
पारनेर : जीवधन किल्ल्यावरील कल्याण दरवाजाजवळील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पारनेर तालुक्यातील ‘आडवाटेचं पारनेर’ व सह्याद्री प्रतिष्ठानच्या युवक-युवतींनी तब्बल तीन ते चार तास श्रमदान करून रस्ता मोकळा केला. यामुळे शिवप्रेमींना किल्ला पाहण्याचा मार्ग मोकळा झाला.
शिवनेरीच्या पुढे जीवधन किल्ला आहे. या किल्ल्यावर कल्याण दरवाजासमोर दरड कोसळल्याने अनेक दिवस रस्ता बंद होता. येथे श्रमदान करण्याची गरज असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमोद खामकर यांनी कान्हूर पठार येथील ‘आडवाटेचे पारनेर टीम’चे प्रमुख प्रा. तुषार ठुबे, माजी सैनिक हरी व्यवहारे, सचिन गायखे यांना सांगितले. त्यांनी टीमबरोबर चर्चा करून श्रमदानाचा निश्चय केला. रविवारी माजी सैनिक हरी व्यवहारे, प्रा. तुषार ठुबे, संकेत ठाणगे, प्रा. चेमटे, प्रतीक शिंदे, प्रदीप ठुबे, महाबली मिसाळ, शुभम फंड, सागर नरवडे, सचिन लंके, छत्रपती नवले, ओम शेळके, मयूर झावरे, आकाश पानसरे, नीलेश कळमकर, योगेश खोसे, कुमुद रणदिवे, विनोद गोळे यांनी रस्त्यावर पडलेले दगड दूर केले.
श्रमदान करण्यासाठी मुलींचा सहभागही मोठा होता. वैशाली घुमटकर, श्रुतिका ठुबे, आरती लोंढे, शीतल भुजबळ, पूजा शिर्के, अनघा ठुबे, प्रियंका वाघमारे, तेजश्री सोनवळे, पूनम व्यवहारे, शुभांगी ठुबे, श्रद्धा ढवण, तेजश्री ताठे, आरती लोंढे, अश्विनी काकडे, साधना लंके, श्रद्धा घुले, पल्लवी धुमाळ, नयना कातोरे यांचा श्रमदानात सहभाग होता.
---
आडवाटेचे पारनेर व सह्यादी प्रतिष्ठान यांनी दुर्गसंवर्धन मोहीम सुरू केली आहे. यात युवकांसह मुलींचा सहभाग मोठा आहे. यातून सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार समजावेत, असा प्रयत्न आहे.
- तुषार ठुबे,
प्रमुख, आडवाटेचे पारनेर
---
२४ पारनेर युथ
किल्ले शिवधन येथे ‘आडवाटेचे पारनेर’ संस्थेच्या युवकांनी श्रमदान करून रस्ता मोकळा केला.