गौतमीच्या आदाकारीने महिलांनाही भुरळ; चक्क स्टेजवरून खाली येत म्हसवंडी गावात महिला प्रेक्षकांमध्ये केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 10:57 AM2023-05-14T10:57:16+5:302023-05-14T11:04:27+5:30

ना गडबड ना गोंधळ गावाचं परफेक्ट नियोजन ठरलं सक्सेसफुल....

Gautami Patil dance also charmed women; He came down from the stage and danced in Mhaswandi village in front of the female audience | गौतमीच्या आदाकारीने महिलांनाही भुरळ; चक्क स्टेजवरून खाली येत म्हसवंडी गावात महिला प्रेक्षकांमध्ये केला डान्स

गौतमीच्या आदाकारीने महिलांनाही भुरळ; चक्क स्टेजवरून खाली येत म्हसवंडी गावात महिला प्रेक्षकांमध्ये केला डान्स

घारगाव (जि. अहमदनगर) :  संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सांस्कृतिक महोत्सव निमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी (१३ मे) रोजी आयोजन करण्यात आले होते. नेहमी स्टेजवर आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. या कार्यक्रमावेळी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं.

गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्रीने  महिलांनी देखील ठेका धरला.  मात्र, या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
म्हसवंडी म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले गाव होय. येथे कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रील स्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास अनेक कार्यक्रमामध्ये राडा होताना पाहायला मिळाला. कुठेही कार्यक्रम असला की कार्यक्रम मधूनच बंद करायला लागत असे.मात्र, या कार्यक्रमात संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली. शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या आजी देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून महिला प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला.

चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीसमवेत शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या यांनीही ठेकाधरत नाचायला सुरवात केली. त्यांना आवरण्यात घारगाव पोलिसांना तर दमछाक झाली. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला. म्हसवंडीतील कार्यक्रमात कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच  व्हायरल होत आहे.

Web Title: Gautami Patil dance also charmed women; He came down from the stage and danced in Mhaswandi village in front of the female audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.