नगरमध्ये गावरान कांद्याला विक्रमी सात हजारांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:15 PM2020-10-18T12:15:44+5:302020-10-18T12:17:01+5:30
नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १७) झालेल्या लिलावात गावरान कांद्याला विक्रमी सात हजार रुपयांचा भाव मिळाला. लिलावासाठी एकूण १७ हजार ८५२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्यालाही तब्बल साडेचार हजारांपर्यंत भाव मिळाला.
अहमदनगर : नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १७) झालेल्या लिलावात गावरान कांद्याला विक्रमी सात हजार रुपयांचा भाव मिळाला. लिलावासाठी एकूण १७ हजार ८५२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्यालाही तब्बल साडेचार हजारांपर्यंत भाव मिळाला.
मात्र लाल कांद्याची आवक कमी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्यामुळे कांदा रोपांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. परिणामी नवीन लाल कांद्याची आवक कमी होत आहे. शिवाय मध्यंतरी भाव काहीसे कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणणे थांबवले होते. त्यामुळे शनिवारी लिलावात भाव आपोआप वाढले. गेल्या महिनाभरापासून गावरान कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
शनिवारी (दि. १७ )झालेल्या लिलावात गावरान कांद्याची १७ हजार ८५२ क्विंटल, तर लाल कांद्याची ८०० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याचे भावही चार हजारांच्या पुढे सरकले आहेत. सध्या नगर बाजार समितीतून कांद्याला दक्षिण भारत, तसेच पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशातून मागणी आहे.
शनिवारच्या लिलावातील भाव (गावरान) प्रथम प्रतवारी ६१०० ते ७०००, द्वितीय ३६०० ते ६१००, तृतीय. १५०० ते ३५००, चतुर्थ. ५०० ते १५०० .
(लाल कांदा) प्रथम प्रतवारी ४००० ते ४८००, द्वितीय १५०० ते ४०००, तृतीय. ५०० ते १५०० चतुर्थ. १०० ते ५००.