समाजातील सर्वांना शिक्षणाची संधी दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:36+5:302021-08-25T04:26:36+5:30
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्सव समितीच्या वतीने ...
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्सव समितीच्या वतीने सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२१वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची रोपे भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळकृष्ण पाटील चोरमुंगे हे होते. विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, कारभारी ताठे, संचालक बाबुराव पलघडमल, जे.पी. जोर्वेकर, पाराजी धनवट, रमेश पन्हाळे, मच्छींद्र अंत्रे, धानोरे गावचे सरपंच ज्ञानदेव दिघे, रंगनाथ दिघे, वसंतराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य दीपक घोलप, कार्यालयीन अधीक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ घोलप यांनी केले. विश्वासराव कडू यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीप्ती आगरकर व विनोद पलघडमल यांनी केले. डॉ. गोरक्षनाथ बोर्डे यांनी आभार मानले.