अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:28 AM2018-08-08T11:28:25+5:302018-08-08T11:28:46+5:30

शहरातील प्रतिष्ठित घरातील महिलांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामीची धमकी देणाऱ्या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी शहरातून अटक केली. 

Gazad | अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड

अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड

अहमदनगर : शहरातील प्रतिष्ठित घरातील महिलांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामीची धमकी देणाऱ्या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी शहरातून अटक केली. जय दादू चौहाण (वय २३ रा. बंगाल चौकी, नगर)असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
चौहान हा गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी राहणा-या चार ते पाच महिलांना व्हॉटस्अ‍ॅपवरून अश्लिल मेसेज पाठवित होता. यामध्ये अश्लिल व्हिडिओ व मेसेज असायचे. या मेसेजच्या माध्यमातून तो महिलांना अश्लिल चॅट करण्याची मागणी करत होता. नकार देणा-या महिलांना बदनामी करून धमकी देत होता. यातील एका महिलेने आठ दिवसांपूर्वी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कॉन्स्टेबल उमेश खेडकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरूण सांगळे, आकाश भैरट, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, प्रशांत राठोड, सम्राट गायकवाड, स्मिता भागवत, उर्मिला चेके यांनी तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी त्याला शहरातील बंगाल चौकी परिसरातून अटक केली.

Web Title: Gazad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.