विसपुते सराफा पेढीत अस्सल पुष्कराज रत्न उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:52+5:302020-12-31T04:20:52+5:30

कोपरगाव : सरत्या वर्षात येत्या ३१ डिसेंबर रोजी शेवटचा गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे. त्यामुळे पुष्कराज रत्न आणि सोने खरेदी ...

Genuine topaz gems available at Vispute Sarafa firm | विसपुते सराफा पेढीत अस्सल पुष्कराज रत्न उपलब्ध

विसपुते सराफा पेढीत अस्सल पुष्कराज रत्न उपलब्ध

कोपरगाव : सरत्या वर्षात येत्या ३१ डिसेंबर रोजी शेवटचा गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे. त्यामुळे पुष्कराज रत्न आणि सोने खरेदी करून यंदाचा आपला वर्षाअखेर ग्राहकांनी अविस्मरणीय बनवावा, असे आवाहन विसपुते सराफी पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी केले आहे.

एकूणच या वर्षी गुरुपुष्यामृताचे मोजकेच मुहूर्त होते. त्यातला या वर्षतला शेवटचा गुरुपुष्यामृत मुहूर्त येत्या ३१ डिसेंबरला आहे. गुरुपुष्यामृताला मुहुर्ताची सोने खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथाच आहे. विशेष म्हणजे पुष्कराज रत्न या दिवशी आवर्जून खरेदी करावे, असे शास्त्र सांगते. पुष्कराज हे रत्न प्रामुख्याने यश प्राप्तीसाठी वापरले जात असल्याने सर्वच क्षेत्रातले व्यावसायिक, व्यापारी बांधव, उद्योजक हे पुष्कराज रत्न हमखास धारण करतात. माफक किंमत आणि वापरायला अत्यंत सोपे रत्न म्हणून ज्योतिषतज्ज्ञही पुष्कराज वापरण्याचा सल्ला देतात. कुणालाही सहज धारण करता येणारे आणि सर्वांना लाभदायी, सुखदायी ठरणारे रत्न म्हणून पुष्कराज रत्न हे वापरण्याचे प्रमाण सर्वसामान्यांमधील सर्वाधिक आहे. विसपुते सराफी पेढीमध्ये विविध वजनात, आकारात आणि रंगछटांमधील ४ ते ५ हजार किमतीपासून अस्सल नैसर्गिक आणि सर्टिफाईड पुष्कराज रत्न गुरुपुष्यामृतासाठी उपलब्ध आहेत. एरवीच्या मुहुर्तावर सोन्याचे दागिने, बस्त्याची खरेदी केली जाते. मात्र गुरुपुष्यामृत मुहुर्तावर खरेदी केलेले सोने हे अक्षय टिकते. त्या दिवशी खरेदी केलेले रत्न निश्चितच लाभते अशी आपली धारणा आहे. शिवाय सोन्यातली गुंतवणूक ही विश्वासार्हत मानली जाते. त्यादृष्टीनेही या दिवसाला विशेष महत्व आहे, असेही विसपुते म्हणाले.

विसपुते सराफी पेढीमध्ये हॉलमार्क दागिन्यांची भरपूर व्हरायटी, उत्तम सेवा, पारदर्शी व्यवहार, कॅरेटो मीटरची सुविधा अशा ग्राहक हिताच्या विविध सेवा देण्याला विसपुते सराफी पेढीत नेहमीच प्राधान्य दिले जाते. पेढीच्या सर्व उपक्रमांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो तसाच तो यंदाच्या गुरूपुष्य मुहुर्तही मिळेल, असा विश्वास पेढीचे युवा संचालक यश विसपुते यांनी व्यक्त केला आहे. (वा.प्र.)

Web Title: Genuine topaz gems available at Vispute Sarafa firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.