कायम कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:55+5:302021-05-13T04:20:55+5:30
कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच आम्हाला ४५ हजार किंवा समान काम समान वेतन नियमानुसार वेतन मिळावे. ...
कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच आम्हाला ४५ हजार किंवा समान काम समान वेतन नियमानुसार वेतन मिळावे. आठवडा सुटीव्यतिरिक्त महिन्याला चार पगारी सुट्या द्याव्यात. मेडिक्लेम काढावा, आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांना मासिक अठरा हजार रुपये मानधनावर काम करावे लागते. प्रत्यक्षात हातात पंधरा हजार रुपयेही येत नाहीत. या कर्मचाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर काम करणारे हे कर्मचारी कोविडमध्येही सेवा देत आहेत. मात्र, न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जागतिक परिचारिका दिनाचा दिवशी आंदोलनाला सुरुवात केली.
बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. कर्मचारी एकत्र जमल्यावर त्यांना कामावर परतण्याचे किंवा पांगण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांबरोबर आंदोलकांची बाचाबाची झाली. यानंतर आंदोलनकर्त्यांचा प्रतिनिधी व संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार तदर्थ समिती व उच्च न्यायालयाला आहेत. त्यामुळे आपण त्यावर तात्काळ निर्णय घेऊ शकत नाही. आपण पाठपुरावा करून लवकरच मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात आंदोलन करू नये, असे आवाहन बगाटे यांनी केले.
नितीन कोते व रवींद्र गोंदकर यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना आंदोलनाची माहिती दिल्यानंतर त्यांनी बगाटे यांना फोन करून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यास सांगितले.
...............
आंदोलन करणाऱ्या पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम तसेच १८८, २७९ प्रमाणे गुन्हे दाखल करून सोडून देण्यात आले आहे.
-प्रवीणकुमार लोखंडे, पोलीस निरीक्षक
...................
दोनशे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कंत्राटी परिचारिकांनी कामबंद आंदोलन केल्याने कायम कर्मचाऱ्यांची त्यांच्या जागी नियुक्ती करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
-डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईबाबा रुग्णालय
फोटो : शिर्डी आंदोलन