घरोघरी जाऊन लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:16+5:302021-09-22T04:25:16+5:30
अहमदनगर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, ...
अहमदनगर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी महापौर राेहिणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली.
माजी महापाैर फुलसौंदर यांनी महापौर शेंडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रावर सध्या लस दिली जात आहे, परंतु अनेकांना केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही. केंद्रावर आल्यानंतर लगेच लस मिळते, असे नाही. त्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. त्यांचा वेळ जातो. त्यात सध्या लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. पूर्वी पोलिओची लस घरोघरी जाऊन दिली जात होती. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली. पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे महापालिकेने नियोजन करावे. शहरातील प्रभागनिहाय घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी फुलसौंदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.