घाटघरला १३१ मि.मी. पावसाची नोंद, २४ तासात साडेपाच इंच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:01 PM2020-06-04T13:01:06+5:302020-06-04T13:01:21+5:30

अकोले: जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाºया तालुक्यातील घाटघर येथे  बुधवारी १३१ मिलिमीटर  तर रतनवाडी येथे १०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद गुरुवारी सकाळी सहा वाजता झाली.

Ghatgharla 131 mm. Rainfall record, five and a half inches of rain in 24 hours | घाटघरला १३१ मि.मी. पावसाची नोंद, २४ तासात साडेपाच इंच पाऊस

घाटघरला १३१ मि.मी. पावसाची नोंद, २४ तासात साडेपाच इंच पाऊस

अकोले: जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाºया तालुक्यातील घाटघर येथे  बुधवारी १३१ मिलिमीटर  तर रतनवाडी येथे १०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद गुरुवारी सकाळी सहा वाजता झाली.
घाटघरला चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस कोसळला. चक्रीय वादळाचा फाटक तालुकालाही बसला असून सुगाव येथे बाभळीचे झाड रस्तावर पडल्याने अकोले-संगमनेर रोडवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.तालुक्यातील बरीच गावात झाडे पडून आंबे व शेती पिकाचे नुकसान झाले आहे. भंडारदरा धरणात २४ तासात ४८ दशलक्षघनफुट नवे पाणी आले आहे. १ जून  पासुनची एकुण ७५ दशलक्षघनफुट पाण्याची आवक झाली आहे. निळवंडे धरणात ५२ दशलक्षघनफुट पाण्याची आवक झाली आहे.
पर्जन्यमान मिलिमीटर मध्ये
भंडारदरा - ७३/ १०२
निळवंडे -  ९८ / ११०  
घाटघर - १३१/१४६ 
रतनवाडी - १०८/ १२३ 
पांजरे - ९१ / ११७
वाकी - ६५ / १८७

Web Title: Ghatgharla 131 mm. Rainfall record, five and a half inches of rain in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.