श्रीगोंदा फॅक्टरीजवळ घोड कालवा फुटला : लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:31 PM2019-09-02T13:31:34+5:302019-09-02T13:38:25+5:30
फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी शिवारात घोड उजवा कालवा चारी क्रमांक 17 च्या तोंडाला सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीत काही घरात पाणी घुसले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चारी क्रमांक 17 मध्ये प्रमोद शिंदे नावाच्या विद्यार्थ्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता आणि जलसंपदा विभागाने कालव्याचे भगदाड न बुजल्याने दुसऱ्याच दिवशी कालवा फुटला त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घोड कालव्याची दुरावस्था
घोड कालव्याचे नुतनीकरणाचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले आहे. कालव्याच्या मुख्य चाऱ्याना गेट नाहीत. कालव्यास ठिकठिकाणी भगदाड पडले आहेत. चाऱ्या नादुरूस्त आहेत. त्यामुळे घोड कालव्यास पाणी येते. पण सिंचन होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.