घोड धरण ओव्हरफ्लो : घोड नदीत 2 हजार क्युसेकने पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:16 PM2019-08-04T12:16:26+5:302019-08-04T12:16:31+5:30
कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे घोड धरणात 24 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे घोड धरणात 24 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आज सकाळी दहा वाजता 7 टीएमसी क्षमतेचे घोड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे श्रीगोंदा, शिरुर, कर्जत तालुक्यातील 60 गावांमध्ये जल्लोष करण्यात आला.
घोड धरणातील पाणी पातळी 82% वर जाताच घोड धरणाचे 29 पैकी 3 दरवाजे उघडून घोड नदीत 2 हजार 160 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. संध्याकाळ पर्यत सुमारे 20 हजार क्युसेकने पाणी घोड नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे घोड व भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घोड धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाची टीम दाखल झाली आहे.