घोडेगाव तलावाने गाठला तळ;  आढळगाव परिसरात पाणी संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:40 PM2020-06-01T16:40:48+5:302020-06-01T16:41:33+5:30

कुकडीच्या गेल्या आवर्तनात एक थेंबही पाणी न सुटलेल्या आढळगाव येथील घोडेगाव तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे.

Ghodegaon lake reached the bottom; Water crisis in Adhalgaon area | घोडेगाव तलावाने गाठला तळ;  आढळगाव परिसरात पाणी संकट 

घोडेगाव तलावाने गाठला तळ;  आढळगाव परिसरात पाणी संकट 

आढळगाव : कुकडीच्या गेल्या आवर्तनात एक थेंबही पाणी न सुटलेल्या आढळगाव येथील घोडेगाव तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे.

   उद्भव आटल्यामुळे आढळगावकरांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पाण्यावरून राजकारण सुरू झाल्याने कोरोनाच्या संकटात पिचलेला शेतकरी पाण्याअभावी होरपळून निघत आहे.

   गेल्या वर्षी कुकडी पाणलोट क्षेत्रात मोेठ्या प्रमाणात पाऊस होऊन धरणांमध्ये मुबलक पाणी साठले. त्यामधून कुकडीची दोन आवर्तने सुटली. मुबलक पाणी असूनही गेल्या मार्च एप्रिलमध्ये झालेल्या आवर्तनातून मुख्य कालव्यावरील डी वाय १०, ११, १२, १३ आणि १४ या चाºयांना पाणी कमी पडले. तसेच सुमारे पाचशे एकर शेती अवलंबून असलेल्या आढळगाव येथील तलावात एक थेंबही पाणी सुटले नाही. 
 

Web Title: Ghodegaon lake reached the bottom; Water crisis in Adhalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.