जय माता दी मित्रमंडळाच्या वतीने दहा ऑक्सिजन मशीनची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:20 AM2021-05-08T04:20:43+5:302021-05-08T04:20:43+5:30
मंडळाने खरेदी केलेल्या यातील काही मशीन रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. याशिवाय, ज्या रुग्णांना घरी काही दिवस ऑक्सिजनची गरज पडेल ...
मंडळाने खरेदी केलेल्या यातील काही मशीन रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. याशिवाय, ज्या रुग्णांना घरी काही दिवस ऑक्सिजनची गरज पडेल त्यांच्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीने मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जय माता दी मित्रमंडळाचे नगरसेवक राजेश अलघ यांंनी सांगितले.
दिवंगत हरिराम अलघ, गौरी अलघ, गिरीधरलाल गुलाटी, चंद्रप्रकाश गुप्ता व मोहनलाल कंत्रोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंडळाने मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीरामपूर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा अत्यल्प पुरवठा होत आहे. कोरोना उपचार केंद्रात सुमारे ३० ते ५० रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. त्यांच्याकडून दररोज २०० ते ३०० इंजेक्शनची मागणी असताना ५० ते ६० इंजेक्शन मिळतात. ते वाढवून मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा अशी मागणी मित्रमंडळाने केली आहे.
मशीनच्या वितरणप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, शम्मीकुमार गुलाटी, अनिल गुप्ता, कंत्रोट महाराज, संजय जोशी, मोहन कथुरिया, सचिन चुडिवाल, प्रवीण गुलाटी, जसमीतसिंग बतरा, जसबीरसिंग गुलाटी, ओंकार जोशी आदी उपस्थित होते.
---