साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:11+5:302021-02-14T04:20:11+5:30

भेंडा : सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ देण्याची एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली. राज्यातील साखर ...

Give 40% pay hike to sugar workers | साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ द्या

साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ द्या

भेंडा : सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ देण्याची एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली.

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील साखर संघाच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. वेतनवाढीच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन चौथी बैठक २६ फेब्रुवारीला पुणे येथे घेण्यावर सर्वांनी सहमती दर्शविली. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, साखर कारखाना प्रतिनिधी

म्हणून अशोक कारखान्याचे भानुदास मुरकुटे, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, चंद्रदीप नरके, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, बी. बी. ठोंबरे, साखर कामगार संघटना प्रतिनिधी इंटकचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ. आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

त्रिपक्षीय समितीच्या पहिल्या व दुसऱ्या बैठकीत वेतनवाढीवर कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे तिसऱ्या बैठकीकडे राज्यातील साखर कामगारांचे लक्ष लागून होते. आजच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ देण्याची एकमुखी मागणी केली. त्यावर दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधींची मते जाणून घेण्यासाठी वेळ मागितली. कामगार संघटनाचे प्रतिनिधींनी कारखानदारांशी चर्चा जरूर करा पण पुढची बैठक तातडीने आठ दिवसातच घ्या अशी मागणी केल्याने पुढील बैठक २६ फेब्रुवारीला पुण्यात घेण्याचे निश्चित केले.

Web Title: Give 40% pay hike to sugar workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.