नगरसेवकांना कोविडसाठी रोख निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:28+5:302021-04-20T04:22:28+5:30
..... प्रोफेसर चौकात कारवाई अहमदनगर: रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर येथील प्रोफेसर चौकात सोमवारी सायंकाळी महापालिकेचे कर्मचारी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली ...
.....
प्रोफेसर चौकात कारवाई
अहमदनगर: रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर येथील प्रोफेसर चौकात सोमवारी सायंकाळी महापालिकेचे कर्मचारी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. चौकात पथक दाखल होताच विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
.....
किरणा दुकानांसमोर रांगा
अहमदनगर: किराणा दुकानदारांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दुकाने बंद होती. सोमवारी सकाळीच ७ वाजता दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांनी गर्दी केली होती. दुकानदारांनी ग्राहकांसाठी वर्तुळात आखले असून, त्यात उभे राहून किरणा दिला जात आहे. त्यामुळे किराणा दुकानांसामोर रांगा लागलेल्या होत्या.
...
रिक्षातून भाजी विक्री
अहमदनगर: भाजीबाजार बंद करून भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने रिक्षाही बंद आहेत. त्यामुळे काहींनी रिक्षातून भाजी विक्री करण्याचा नवा व्यवसाय सुरू केला असून, शहरात रिक्षातून भाजी विकणारे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.
....
कोथिंबिरीची जुडी ३० रुपयांना
अहमदनगर: कोरोनामुळे भाजीबाजार बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला मिळणे कठीण झाले असून, त्याचा गैरफायदा विक्रेते घेत आहेत. मागील आठवड्यात कोथिंबिरीची जुडी १० रुपयांना मिळत होती. ती ३० रुपयांना विकली जात आहे.