जाहीर केलेले दीड हजार तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:52+5:302021-06-17T04:15:52+5:30

या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांना दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, ...

Give the declared one and a half thousand immediately | जाहीर केलेले दीड हजार तातडीने द्या

जाहीर केलेले दीड हजार तातडीने द्या

या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांना दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, वीणा सोनवणे, प्रमिला रोकडे, रेखा पाटेकर, संजीवनी बोरुडे, उषा बोरुडे, पठाण आदी उपस्थित होत्या. घरेलू मोलकरीण कामगारांना राज्य सरकारने देऊ केलेली दीड हजाराची आर्थिक मदत न मिळाल्यास येत्या दहा दिवसात संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धुणी-भांडी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने ३० एप्रिल २०२१च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. मात्र ही मदत अद्यापपर्यंत मिळालेली नाही.

----

फोटो १६ कामगार

ओळी- घरेलू कामगार महिलांना राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजार रुपयांची मदत तातडीने मिळावी, अशी मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्यावतीने सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.

Web Title: Give the declared one and a half thousand immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.