एसटी कर्मचा-यांना सन्मानजनक वेतन द्या - भापकर गुरूजी यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 06:41 PM2018-03-04T18:41:58+5:302018-03-04T18:42:58+5:30
एसटी कर्मचारी आज तुटपुंज्या पगारात उत्तम सेवा देत आहेत. शासनाने त्यांच्या सेवेची, कामाची कदर करून त्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.
अहमदनगर : एसटी कर्मचारी आज तुटपुंज्या पगारात उत्तम सेवा देत आहेत. शासनाने त्यांच्या सेवेची, कामाची कदर करून त्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.
आज एसटी सेवेशिवाय प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. मध्यंतरी एसटी कर्मचा-यांनी संप केला, तेव्हा झालेल्या गैरसोईवरून प्रवाशांना एसटीचे महत्व समजले. म्हणजे एसटीशिवाय तासभरही प्रवाशी दम काढू शकत नाही. एवढी ही महत्वाची एसटी सेवा वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे चोवीस तास नित्यनियमाने आणि प्रामाणिकपणे करणाºया एसटी कर्मचा-यांची अवस्था पुरेशा वेतनाअभावी दयनीय आहे. आताच्या त्यांच्या वेतनाचा विचार केला तर त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण कसेबसे होते. पेन्शनची सोय नसल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जीवन कष्टमय ठरते. स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वांना सुखकर व सुरक्षित प्रवाशीसेवा देणाºया या कर्मचा-यांना एसटी महामंडळाने पुरेशा सवलती व सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्यावे.
आजच्या महागाईचा विचार करता एसटी कर्मचाºयांना योग्य मोबदला व चांगले वेतन द्यावी, अशी मागणी भापकर गुरूजी यांनी केली आहे.