भूमिहीनांना घरटी एक एकर जमीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:39+5:302021-01-16T04:23:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील भूमिहीन नागिरकांना घरटी एक एकर जमीन मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील भूमिहीन नागिरकांना घरटी एक एकर जमीन मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक सर्व श्रमिक संघटनांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
अखिल महाराष्ट्र ऐक्यवर्धक श्रमिक संघटनांचे कार्याध्यक्ष उदय हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे बैठक झाली. या बैठकीस शाखाध्यक्ष नवनाथ डोळस, नवनाथ चाैधरी, संजय त्रिभुवन, अविनाश वाघमारे, बाळासाहेब त्रिभूवन, आदी उपस्थित होते. यावेळी राज्यातील भूमिहीन नागिरकांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे अशा भूमिहीन नागरिकांना सरकारने प्रत्येकी एक एकर जमीन द्यावी. कर्मवीर दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीनांना जमीन मिळवून देण्यासाठी पाठपुरवा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
...
सूचना फोटो आहे.