दुधाला ३० लिटर रुपये भाव द्या- रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:53 AM2020-07-20T11:53:31+5:302020-07-20T11:55:11+5:30

अकोले : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे सोंमवारी सकाळी आंदोलन सुरू झाले. शासनाने १० रुपये प्रति लिटर अनुदान शेतकºयांच्या खात्यात तातडीने वर्ग करावे, अशीही मागणी शेतकºयांची आहे.

Give Rs 30 liter price for milk - Government protests by pouring milk on the streets | दुधाला ३० लिटर रुपये भाव द्या- रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

दुधाला ३० लिटर रुपये भाव द्या- रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

अकोले : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे सोंमवारी सकाळी आंदोलन सुरू झाले. शासनाने १० रुपये प्रति लिटर अनुदान शेतकºयांच्या खात्यात तातडीने वर्ग करावे, अशीही मागणी शेतकºयांची आहे.

अकोले शहरातील महात्मा फुले चौकात रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. रस्त्यावर दूध ओतणे म्हणजे सरकारचा प्रतिकात्मक अभिषेक घालून निषेध केल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरत जाणार आहे. अकोले तालुक्यातही २१ जुलै पासून तालुकाभर दुग्धभिषेक आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, किसान सभेचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले, अध्यक्ष सुरेश नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. शांताराम वाळुंज, लक्ष्मण नवले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संयोजक डॉ संदीप कडलग, सोमनाथ नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब ताजने, सिद्धेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष संदीप शेटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष व नगरसेवक सचिन शेटे, रोहिदास धुमाळ, कॉ. खंडू वाकचौरे, स्वप्नील नवले, गणेश ताजने आदी दूध उत्पादक संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Give Rs 30 liter price for milk - Government protests by pouring milk on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.