शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:22+5:302021-06-01T04:16:22+5:30
श्रीरामपूर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी आशा लिफ्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोविडच्या ...
श्रीरामपूर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी आशा लिफ्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोविडच्या कामातून मुक्तता करावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख विमा योजनेची अंमलबजावणी करावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश होता.
कोविड संकटात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची कामे सांगितली जात आहेत. कोविड योद्धे म्हणून सरकार या कामाचा गौरव करत आहे. परंतु त्यांच्या न्याय मागण्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दरमहा निवृत्ती वेतन देण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मान्य नसणारे कायदे रद्द करावे, सरकारने ४१ कामगार कायदे बदलून आणलेल्या कामगार विरोधी नवीन श्रम संहिता रद्द कराव्या, सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबवा, वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. बुधवारचे आंदोलन हे त्याचाच भाग होते, असे युनियनच्या वतीने सांगण्यात आले. आंदोलनात युनियनचे सहचिटणीस जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख, स्मिता लोंढे, अनिता परदेशी, प्रमिला सुलाखे, रेखा शिरसाठ, अनिता होले, ज्योती लबडे सहभागी झाले होते.