बसपातर्फे आज सहयोग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:35+5:302021-01-16T04:23:35+5:30
---------------- भूमीगुंठा आवास योजना अहमदनगर : निंबळक येथे घरकूल वंचितांसाठी प्रस्तावित आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी ...
----------------
भूमीगुंठा आवास योजना
अहमदनगर : निंबळक येथे घरकूल वंचितांसाठी प्रस्तावित आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची या बैठकीला उपस्थिती होती. घरकूल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्य व केंद्राकडून विशेष बाब म्हणून साडेतीन लाख रुपये अनुदान मिळण्याबाबत बैठकीत मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत घरकूल वंचितांच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला कारभारी गवळी,नगर विभागाचे उपसंचालक आकाश बागूल, श्रीनिवास महादेवराव, सुनीलकुमार पठारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, संघटनेचे अशोक सब्बन उपस्थित होते.
---------------
युवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
अहमदनगर : नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. युनिट, आय.सी.टी.सी. विभाग, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा.अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.नवनाथ आगळे, एन.सी.सी.चे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान, प्रा. डॉ. एम. बी. शेख, डॉ. डी. जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव आदी उपस्थित होते. सागर अलचेट्टी यांनी प्रास्ताविक केले. रक्तदान शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला.
----------------